Tuesday 31 July 2012

१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दरिद्रे असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरीबच निरक्षर पोर.!! गावाच्या शाळेत नाव घालण्या साठी व दुसऱ्यादिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाउंचा शाळा व शिक्षणाचा संबंध. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. अण्णाभाउ मुंबईत रिकाम्या पोटी मराठी माणूस उभा करून त्यातला मराठी माणूस जागा करीत होते. अण्णाभाउंनी एकूण पुस्तके/ग्रंथ संख्या"७७" आहे, अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशिअन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशिया च्या राष्ट्रपती कडून त्यांचा सन्मान देखील झाला, तमाश्यात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाउंनी झिडकारून व मातृभूमिसह शिवरायांना वंदन असणारी परंपरा रूजू केली ती अशी, "प्रथम मायभूच्या चरणा छत्रपती शिवबा चरणा स्मरोनी गातो | कवना ||" "माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली" हे अतिसुंदर काव्य देखील त्यांनीच लिहिले आहे. संयुक्त महाराष्ट्र देखील अण्णाभाउंनी लोककलातून समाजास दिलेल्या दिव्या दृष्टीमुळेच साकार झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली "ये आझादी जुठी हे देश किजनता भुकी हे" असा नारा शिवाजी पार्क वर दिला तेव्हा त्या दिवशी रौद्र रूप धारण केलेल्या उभ्या पावसाची नोंद अद्याप देखील झाली नाही, तरी अण्णाभाऊ मागे हटले नाहीत. अण्णाभाउंच्या वैजयंता, आवडी, माकडीचा चाल, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगुज, फकीर या सात कादंबऱ्यावर मराठी भाषेत निघालेले चित्रपट सुपरहिट ठरले. चार चित्रपटांना विविध पारितोषिके मिळाली, अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून राजकीय क्रांती व सामाजिक परिवर्तन झाले. अण्णाभाउंना केवळ ५० वर्षाचे आयुष्य लाभले!! याउलट, कुसुमाग्रज हे पुण्यातील श्रीमंत घरातील होते पुण्यात शिक्षण झाले तसेच उर्वरित शिक्षण मुंबई मध्ये, पुढील आयुष्य अमराठी लोकांची चाकरी करण्यात घालवली, तसेच१४(कादंबरी, ललित लेख, कविता संग्रह, नाटक)+अनुवादित बरेच लिखाण केले, पण कुठेही मराठी, भूमिपुत्र, संघर्ष, श्रमकरी, कष्टकरी,शेतकरी यांच्या व्यथा मांडल्या नाहीत शिवाय त्यांना पेशवाई व बामन शाहीची आग नव्हती, आणि सांगतात आयुष्य भर मराठी ची सेवा केली, त्यांना ८७ वर्षाचे आयुष्य लाभले........!! ....पण या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल वातावरणात, परंपरागत निरक्षर वातावरणात, वाईट-रुढ्या परंपरा जोपासणाऱ्या समाजात धर्मानेच शिक्षण-सत्ता-संपती नाकारलेल्या समाजात, अज्ञान गरिबी हेच भांडवल असलेल्या कुटुंबात, शेकडो पिढ्या अक्षर ओळख नसलेल्याजातीत जन्माला येऊन संपूर्ण जगाला ज्ञानी वस्वावलंबी करणारे महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब, प्रबोधनकार ठाकरे, साहित्य सम्राट अण्णाभाउ साठे, शाहीर अमरशेख, बहिणाबाई, बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक, डॉ. सरोजिनी बाबर, संत गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कृ.बा. बाबर, अश्या अनेक बहुजनांनी कुसुमाग्रजांपेक्षा लाखो पटीने लिखाण केले, मराठी भाषाच नव्हे तर भाषा-प्रांत समुद्ध केला, ते कोणीही बामन नव्हते हीच कमतरता आहे. म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील मराठी साहित्य, शिवचरित्र परदेशात प्रसार करणाऱ्या साहित्य सम्राट शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्मदिन १ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन !!

Friday 20 July 2012

How Shivaji demolished Manusmriti

Shivaji violated many laws of Manusmriti. Here is a brief account of his Anti-Manusmriti activities. Shivaji was a great king of medieval Maharashtra . He was contemporary of Moghul Emperor Aurangzeb and Ali Adilsah, Sultan of Bijapur. In very odd situations, Shivaji was successful in establishi ng his own kingdom. Although people know him as a Hindu King, he was not a Vedic. Actually he was a follower of Shaivism in his personal life. But as a King, hewas not in favor or against other religions. He was a true secular. However, he never supported the holy law book of Vedics known as Manusmriti, which was imposed on Indians for more that two millenniums. There are at least eight instances, where he breached the laws imposed by Manusmriti. Giving Arms to Shudra People According to the Manusmriti, only warrior communities, i.e.Kshatriyas had been given theright of bearing arms. Other people like Shudras and atishudras were banned from this right and they had no right of joining army. Shivaji breached this rule and invitedpeople from all sections of thecommunity to join his army. Shivaji’s army was made of cultivators, craftsmen, tribals, fishermen and people living at outskirts of villages. All these people were Shudras and atishudras according to the Manusmriti. Collaboration with Mlenchh People Although fanatic Vedic historians have projected himas an anti-Muslim King, Shivaji was not against Islam or Muslims. You can see a highnumber of Muslim officers and soldiers in his Navy, Artillery and army. The number of Shivaji’s Muslim officers and soldiers was far bigger than that of Vedic Brahmins. We should remember that both the Chiefs of Shivaji’s navy and artillery were Muslims. Even many of Shivaji’s bodyguards were Muslims. A division of Shivaji’s army was particularly for Muslims, having 700 soldiers. This number is definitely a big one, as Shivaji’s army was a not very big and all the battleshe fought were with help of atiny number of soldiers. Collaborating with Muslims was also a breach of the rules of Manusmriti, as according toit Muslims can be classified as Mlenchh people. Manusmriti never allowed accepting Mlenchh people to collaboratewith. Opposing Tradition of Sati Shivaji breached the laws of Manusmriti again and again. According to Manusmriti, if a man dies, his wife also has to die by jumping in the funeral pyre. This tradition was known as Sati. When Shivaji’s father Shahaji died, Jijau, Shivaji’s mother decided to become a Sati, but Shivaji opposed to do so. This was again a breach of the laws of Manusmriti. Traveling through Sea In another instance of breaching the laws imposed by Manusmriti, Shivaji founded his own navy, and hehimself traveled through sea and even took part in attack on enemy territories through sea routs. Manusmriti does not allow traveling by see andthe offender has to perform penance for it. This tradition was observed even until the first half of last century. But Shivaji breached the rule and never performed a penance for it. Remember that it was 17 th century and the rules were very strict at that time. His son learned Sanskrit Language Manusmriti does not allow people other than Brahmins to learn, speak, and write or even to listen Sanskrit language. But overthrowing this rule, Shivaji arranged tutoring of this language for his son Sambhaji. Sambhaji became scholar of this language and wrote a book inSanskrit. Thus we see that both Shivaji and Sambhaji were offenders according to the Manusmriti. Reconvertion Netaji Palekar was an officer in army of Shivaji. Eventually, he got converted to Islam. Shivaji reconverted him. His another officer Bajaji Nimbalkar had also adopted Islam. Shivaji not only reconverted Bajaji, but made him his sister in law by arranging his marriage with own daughter. This was surely against Manusmriti lawas as Manusmriti does not permit such things. Marrying with a Dalit Woman After establishment of his own kingdom, Shivaji wantedto coronate himself, but the Brahmins opposed to do so. They declared that Shivaji wasnot a Kshatriya but a Shudra, and according to Manusmriti, a Shudras can not become a king. So Shivaji coronated himself by inviting a Brahmin from Kashi, who take a huge amount of gold coins the coronation ceremony. But later Shivaji arranged anothercoronation according to Shakttradition. For performing the rituals, according to the Shakt rules, he married with an Atishudra (Dalit) girl. This wasalso an offence of breaching the laws of Manusmriti.

Wednesday 18 July 2012

साहित्य सम्राट : अण्णाभाऊ साठे

आजवर भरपूर कादंबऱ्या वाचल्या. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या? कारण, कादंबऱ्यातच लेखकाची सर्व शक्ती पणाला लागते ! कादंबरीतच लेखकाच्या पूर्ण विचारशक्तीची जाण होते. लेखकाला हे सर्व कथात्मक कसे सुचत असावे, स्वतःस असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही! लेखकाचीच विचारशक्ती पडद्याबिगर आपल्या डोळ्यासमोर कादंबरीतील घटनाचीत्र दाखवत असते. कथेतील चुरस जाणून घेण्यात आपण कादंबरी वाचनाच्या ओढीला लागतो. हे लेखकाला सुचलेल्या कथेमुळे, प्रसंगामुळे, पात्रांमुळे शक्य होते. यात आज आम्हाला आण्णाभाऊ साठेंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, त्या काळात जातीवादामुळे आण्णाभाऊ साठे शिक्षणापासून वंचित राहिले. मातंग समाजातील मुलगा म्हणून ब्राह्मण मास्तरांनी अण्णाभाऊ साठेंना शाळेतून बाहेर काढले. परंतु आज आण्णाभाऊ साठेंची लौकिकता सांगावी लागत नाही. दीड दिवस शाळेत गेलेले आण्णाभाऊ साठे यांची 'फकिरा' नावाची कादंबरी M. A.च्या अभ्यासक्रमात आहे. आण्णाभाऊ साठेंनी तब्बल ३५ कादंबऱ्या लिहिल्या. फकिरा, वैजयंता, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज, कवड्याचे कणीस, पाझर, वैर, डोळे मोडीत राधा चाले, गुलाम, चित्रा, धुंद रानफुलाचा, रानगंगा, मास्तर, मंगला, जीवंत काडतूस, तास, संघर्ष, रूपा, रानबोका, फुलपाखरू अशा त्यांच्या काही कादंबऱ्या. 'फकिरा'सारख्या काही सातासमुद्रापलीकडे पोहचल्या. ३५ पैकी ७ कादंबऱ्यावर चित्रपट बनवण्यात आले. अण्णाभाऊ साठेंचा कथासंग्रह खूप मोठा होता. बरबाद्या कंजारी, फरारी, लाडी, भानामती, पिसाळलेला माणूस, चिरानगरची भुतं, निखारा, नवती, आबी, गजाआड, क्रुष्णा काठच्या कथा, खुळंवाडी अशी तब्बल तेरा नाटकं आण्णाभाउंनीप्रसिद्ध केली. सुलतान , पेंग्याच लगीन, इनामदार यांचाही या यादीत समावेश आहे. याबरोबर साठेंनी शिवरायांचा स्वराज्य संदेश ही पोवाड्यातून लोकांपर्यंत पोहचवला, म्हणून लोकांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली. याचबरोबर यांनी नेसरीच्या खिंडीतमृत पावलेल्या प्रतापराव गुजर अशा पराक्रमीमावळ्यांवर 'अग्निशिखा' ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, कलंत्री, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर, शेटजीचं इलेक्शन, पुढारी मिळाला, मूक मिरवणूक्, माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, दुष्काळात तेरावा असे अनेक तमाशेही साठेंनी प्रसिद्ध केले. 'माझा रशियातील प्रवास' हे साठेंचे प्रवास वर्णन ही रशियात प्रसिद्ध झाले. याच बरोबर नानकीन नगरापुढे, स्टलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब-दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमरनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्याबाजाराचा पोवाडा असे त्यांचे सु-प्रसिद्ध पोवाडे. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटयेअण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरूडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले. सांगली जिल्ह्यातील खेडेगावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे फक्तसाहित्य सम्राटच नव्हे तर समाजसुधारकही होते. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्याचळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रमुख भूमिका आहे. अण्णाभाऊ लावण्या, शाहिरी, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले. यातून अण्णाभाऊ साठेंची कारकीर्द आजही चालू आहे. आपल्यासारख्या नवख्यांना याच्यामुळेच प्रेरणा मिळते म्हणून आज आम्ही अण्णाभाऊ साठेंना स्मरूनच लेखणी उचलतो! ३६५ दिवसापैकी १ दिवस मराठी दिन साजरा केला जातो,उरलेले ३६४ दिवस अण्णाभाऊ साठेंच्या नावे मराठी दिन साजरा करूयात.

Saturday 14 July 2012

तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती...?

महात्मा ज्योतिराव फुले कुणबी, माळी, मांग, महार या जातींचा उल्लेख एकत्रितपणे करतात, फुल्यांच्या संपूर्ण वाङ्मयात असे उल्लेख ठिकठिकाणी येतात. ‘ब्राह्मणांचे कसब' हा ग्रंथ फुले यांनी या जातींनाच अर्पण केला आहे. अर्पण पत्रिकेत फुले म्हणतात, ‘महाराष्ट्र देशांतील कुणबी, माळी, मांग, महार यांस हे पुस्तक ग्रंथकत्र्याने परम प्रीतीने नजर केले असे'. यावरून फुले यांची या जातींविषयी असलेली तळमळ दिसून येते. आपण मराठा-कुणबी हे एक असल्याविषयीचा महात्मा फुले यांचा अधिक स्पष्टपणे समोर येणारा अभिप्राय पाहणार आहोत. फुले यांचे ‘शेतकरयाचा असूड' हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. हे पुस्तक लिहित असताना फुले यांची अनेकांशी चर्चा झाली. त्यातील दोन गृहस्थांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील ज्योतिरावांनी पुस्तकाच्या शेवटी परिशिष्टात दिला आहे. त्यातील पहिल्या परिशिष्टाचे शीर्षक आहे ‘खासा मराठा म्हणविणाराङ्क. हे शीर्षकच अन्वयर्थक आहे. फुले यांची लेखनकामाठी सुरू असताना एक गृहस्थ त्यांच्या घरी येतात. गृहस्थांसोबत झालेला चर्चेचा तपशील फुले यांनी या परिशिष्टात दिला आहे. त्यातील काही अंश पुढे देत आहे- ‘‘त्यांनी (फुले यांच्याकडे आलेल्या गृहस्थाने) आपला मोहरा मजकडे फिरवून , आपणहूनच मला प्रश्न केला की, तुम्ही मला ओळखले नाही काय?'' मी म्हणालो, ‘‘नाही महाराज, मी तुम्हाला ओळखले नाही. माफ करा.'' गृहस्थ म्हणाला, ‘‘मी मराठी कुळातील मराठी आहे.'' मी - तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती?'' गृ. - ‘‘माझी जात मराठे'' मी - ‘‘महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत, त्या सर्वांसच मराठे म्हणतात. तरी तुम्ही अमुक जातीचे आहात याचा उलगडा तेवढ्याने होत नाही.'' गृ. - ‘‘तर मी कुणबी आहे असे समजा.'' महात्मा फुले यांनी दिलेला हा संवाद इतका स्पष्ट आहे की, मराठा आणि कुणबी या जाती एकच आहेत, हे सांगण्यासाठी आणखी वेगळा पुरावा देण्याची गरजच राहिलेली नाही. ‘‘महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत, त्या सर्वांसच मराठे म्हणतात.ङ्कङ्क हे महात्मा फुले यांचे वाक्य ऐतिहासिक सत्य आहे. महाराष्ट्रातील फौज कोणाच्याही नेतृत्वाखाली लढली, तरी तिला मराठा फौज असेच म्हटले जात असे. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील प्रत्येक शिपाई हा मराठा म्हणूनच ओळखला जात होता. पेशवाईच्या काळात मराठे पाणिपतावर लढले. तेव्हा या फौजेला कोणी पेशव्यांची फौज म्हटले नाही. तिला मराठ्यांची फौज असेच म्हटले गेले. आजही महाराष्ट्राबाहेर मराठी लोकांना मराठे असेच म्हटले जाते. त्यामुळे मराठ्यांची खरी जात कुणबी हीच आहे, हे सिद्धहोते...!!!

Wednesday 11 July 2012

कुणबी-मराठा एकच : तुकोबांच्या गाथ्यातील पुरावे

बरे झाले देवा कुणबी केलो मराठा आणि कुणबी या जाती एकच आहेत, हे पाहण्यासाठी आपण आता जगद्वंद्य जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांत मागे ठेवलेले पुरावे पाहणार आहोत. संत तुकाराम हे जन्मजात महाकवी होते. त्यांनी आपल्या मनातील भाव व्यक्त करताना कोणताही आडपडदा ठेवला नाही. घरात पत्नी रागावली तरी त्यांनी त्याचे अभंग रचून ठेवले. मन आवरताना होणा-या यातनाही अभंगरूपाने लिहून ठेवल्या. त्यासाठी एकच उदाहरण देते. तुकाराम म्हणतात, काय काय करितो या मना । परी ते नाईके नारायणा ।। संत तुकाराम प्रत्यक्ष कविताच जगत होते. सर अ‍ॅलेक्झांडर ग्रँट या इंग्रजी विद्वानानेतुकारामांना ''भारताचे राष्ट्रीय कवी'' अशी उपाधी दिली होती. ( ग्रँट यांच्या विषयीच्यामाहितीसाठी तळटीप पहा. ) या पाश्र्वभूमीवर संत तुकारामांनी कुणबी या जातीबद्दल मागे ठेवलेल्या पुराव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे संत तुकारामांचा उल्लेख करताना विविध प्रकारच्या जातीवाचक उपाध्या लावला जातात. परंतु त्या सर्व त्यांच्या व्यवसायानुसार लावल्या गेल्या. त्यांना वाणी म्हणत. तुका झाला वाणी । चुकवुनी चौरयांशीच्या खाणी ।। अशा अभंग पंक्तीमुळे त्यांना वाणी म्हटले गेले. तुकारामांकडे मोठा व्यापार-उदिम होता. त्यामुळे त्यांनी हा उल्लेख प्रतिकात्मकरित्या केला आहे. तुकारामांनी सर्व संसाराचा त्याग केला होता; म्हणून त्यांना गोसावी म्हटले गेले. त्यांच्या घराण्यात महाजनकी होती; म्हणून त्यांना महाजन म्हणण्याचीही प्रथा होती. परंतु या सर्व उपाध्या होत. त्याचा तुकारामांच्या जातीशी काहीही संबंध नाही, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. तुकारामांचे मुळचे घराणे क्षत्रियांचे होते. परंतु कालौघात ब्राह्मणांनी स्वत: वगळता इतर सर्व वर्णांना वेदाधिकार नाकारला. त्यामुळे क्षत्रिय जातीही शुद्र गणल्या गेल्या. त्यामुळे तुकाराम स्वत:चा उल्लेख शुद्र असा करतात. असा उल्लेख करताना त्यांच्या मनातला नम्र भावही प्रकट होतो. भेदाभेद भ्रम अमंगळ या आपल्या उक्तीशी प्रमाणिक राहून तुकाराम स्वत:ला शुद्र म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. संत तुकारामांच्या गाथ्यात असे असंख्य अभंग आपणास दिसून येतात. मात्र या सारयांत न पडताएकच उदाहरण देते. ‘‘आपणांस वैराग्य कसें प्राप्त झाले याविषयी तुकोबारायांचे संतांशीं व देवाशीं संभाषण'' या शीर्षकाखाली काही अभंग तुकाराम गाथ्यात आहेत. त्यातील पहिल्याच अभंगातील काही पंक्ती अशा - याती शुद्र वैश्य केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य ।।१।। नये बोलो परि पाळिले वचन । केलिया प्रश्न तुम्ही संती ।।२।। दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान । स्त्री एकी अन्न करिता मेली ।।४।। लज्जा वाटे जीवा त्रासलो या दु:खे । वेवसाव देखे तुटी येता ।।५।। या अभंगात तुकाराम स्वत:ला शुद्र म्हणतात. वैश्य (व्यापार) व्यवसाय केल्याचे नमूद करतात. मी वैश्य आहे असे म्हणत नाहीत. याचाच अर्थ तुकाराम हे वैश्य नव्हते. मग ते कोण होते? त्यासाठी खालील अभंग पाहा - बरे झाले देवा कुणबी केलों । नाही तरी दंभे असतो मेलो ।।१।। भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ।।२।। तुका म्हणे थोरपणे । नरक होती अभिमाने ।।६।। या अभंगात संतश्रेष्ठ तुकाराम देवाला उद्देशून म्हणतात, ‘‘देवा बरे झाले तू मला कुणबी केले. उच्च जातीत जन्माला घातले असतेसतर मी फुकाचा ताठा मनात बाळगून मेलो असतो.'' आपण कुणबी असल्याचा आनंद होऊन तुकाराम नाचतदेवाच्या पायी लागतात. हे दुसरया कडव्यावरून स्पष्ट होते. या पुराव्यांवरून एक गोष्ट सूर्य प्रकाशाइतकी स्पष्ट आहे कि, तुकाराम हे कुणबी जातीत जन्माला आले होते. वारकरी संतांनी आपल्या जाती कधी लपविल्या नाहीत. या उलट संतांनी आपल्या जाती मिरविल्या. कारण कोणतीही जात श्रेष्ठ नाही, तसेच कोणतीही जात कनिष्ठही नाही, अशी त्यांची निस्सीम श्रद्धा होती. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ' हाच वारकरी पंथाचा आत्मा होता. *कुणबी-मराठा पर्यायवाचक यातीनामे असो.* या वरून एक गोष्ट निर्विवाद सिद्ध होतेकी, तुकाराम कुणबी होते. पण खरा प्रश्न असा आहे की, यावरून कुणबी आणि मराठा या जाती एकच आहेत, हे सिद्ध होते का? याचे उत्तर आहे - होय, कुणबी आणि मराठा या जाती एकच आहेत, हे यावरून सिद्ध होते. तुकारामा नंतरच्या त्यांच्या बहुतेक पिढ्या आपली जात मराठा अशीच नोंदवित आहेत. तुकारामांचा मूळचा वंश शिवकालीन मोरे घराण्यातील आहे. त्यांचे वंशज आजही मोरे हेच आडनाव वापरतात. जावळीचे मोरे इतिहासात प्रसिद्ध आहेत. ते स्वत:ला पूर्वापार मराठा याच नावाने संबोधतात. याचाच अर्थ कुणबी आणि मराठा ही दोन्ही यातीनामे एकमेकांना पर्यायवाचक ठरतात.