बरा कुणबी केलों । नाही तरि दंभेचि असतों मेलों ॥ - जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
Monday, 22 October 2012
मराठा सेवा संघ ही आता एक व्यवस्था झाली आहे - पुरुषोत्तमजी खेडेकर.
जळगाव (दि. 15 जुलै ) - 'मराठा सेवा संघाच्या 21 वर्षाच्या कालावधीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याच्या जोरावर मराठा सेवा संघ हि आता संघटना राहिली नसून ती व्यवस्था झाली आहे' अशी भूमिका युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी जळगाव येथे झालेल्या मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली. या प्रसंगी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि. शिरीष जाधव, कार्याध्यक्ष कामाजी पवार , प्रदेश सचिव मधुकर मेह्करे आदी मान्यवर उपस्थित होते. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना खेडेकर साहेब पुढे म्हणाले कि, महामानवांनी प्रचंड कार्य केले. परंतु ते व्यवस्था निर्माण करू शकले नाही. याचा कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करावा. मराठा सेवा संघ हि केवळ इंजिनिअर किंवा कर्मचार्यांचे हित जोपासण्यासाठी निर्माण केलेली संघटना नाही तर कर्मचार्यांनि एकत्र येवून समाजाच्या प्रगतीसाठी कार्य हि अपेक्षा आहे. कोणत्याही संघटनेत सेवा करताना मेवा घेणाऱ्यांची संख्या असतेच अशा लोकांनी मेव्याचा काही भाग तरी संघटनेला दिलाच पाहिजे, पुण्यात तुमचा नातेवाईक अडचणीत आला तर आम्हाला फोन करता परंतु हा नातेवाईक मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात का दिसत नाही हि हरामखोरी आहे. संघटनेत शाशकीय पातळीसारखी यंत्रणा राबवता आली पाहिजे गावात एक तरी संघटनेचा प्रतिनिधी असावा. प्रत्येक पदाधिकार्यांना सदस्य म्हणून बोलता आले पाहिजे. त्यासाठी फक्त काम करण्याची हौस असल्याबरोबरच निष्टा व झोकून देण्याची वृत्ती हवी. पदाधिकारी हा मांजरी सारखा असावा कसेही फेकले तरी चार पायावर त्याला राहता यावे. पदाधिकार्यांनी एखादा तरी छंद असा जोपासावा कि त्या क्षेत्रातील काहीही प्रश्न निर्माण झाला तर तुमच्याशीच संपर्क साधला जावा. मराठा सेवा संघात सध्या जी शिथिलता निर्माण झाली आहे. त्याचे कारण असे तर नाही कि गुरुत्वाकर्षण शक्तीचा एक नियम आहे एखादी वरफेकलेली वस्तू एका उंचीवर जावून खालीच येते असे होवू नये. मराठा सेवा संघ कोणाही पदाधिकाऱ्यांची खासगी प्रॉपरटी न होता नवीन कार्यकर्ते संघटनेत आले पाहिजे त्यासाठी प्रोग्राम हवा . कोणतीही चळवळ यशस्वी व्हायची असेल तर त्यास राजकीय पाठींबा हवा . त्यासाठी राज्यकर्त्यावर आपला अंकुश ठेवता आला पाहिजे . परंतु आपण सामाजिकदृष्ट्या पन्नास हजार लोक एकत्र आणू शकतो परंतु त्यातील 50 लोकही आपण मतदानाच्या दृष्टीने परावर्तीत करू शकत नाहीत यावर गांभीर्याने विचार करा . आपण बदलत नाही तेच तेच लेख, तीच तीच भाषणे किती दिवस करणार ? हा प्रश्न उपस्थित करून खेडेकर साहेब यांनी नवीन कार्यक्रम लावण्याचे आवाहन केले . त्याचे उदाहरण देताना ते म्हणाले कि सध्या राजकुमार तांगडेयांचे 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक पाहण्यासारखे आहे याचे किमान 10 प्रयोग तरी मराठा सेवा संघाच्या वतीने लावा . मराठ सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना शोधून चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करा . PDSP व वीर भगतसिंहविध्यार्थी परिषद ( VBVP ) या संघटनांनी टायलेंट शोधून काढावेत . आपले खरे कार्यकर्ते छोट्या पेपरचे वाचक आहेत . त्यामुळे अशा छोट्या पेपरला बातम्या , लेख द्या . कार्यकर्त्यांनी पैसे खर्चायला जसे आवडते तसे जमा करता आले पाहिजे . कार्यकर्ता सतत फिरता हवा सध्या ब्रिगेडीयर सुधीर सावंतमहाराष्ट्रभर रात्रंदिवस फिरत असून त्यानंतर प्रदीप सोळुंकेचा नंबर लागतो . यांचा आदर्श घ्या . सिंदखेडराजा येथील पाण्याचा प्रश्न इंजि. चंद्रशेखर शिखरे यांच्या प्रयत्नाने सुटला आहे . आपले अनेक पदाधिकारी संघटनेत काम करताना घराकडे दुर्लक्ष करतात आपले कुटुंब नातेवाईक समाजात येत नाहीत काय ? असा प्रश्न विचारून खेडेकर साहेब यांनी सर्वाना कुटुंब नातेवाईकांकडे लक्ष देण्याचे आश्वासन केले .या प्रसंगी शिवराज्यपार्टीच े प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत , जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष वासंती नलावडे , वीर भगतसिंह विध्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके , पंजाबराव देशमुख शिक्षक परीशधेचे प्रदेशाध्यक्ष पप्पू पाटील भोईर , संभाजी ब्रिगेड चे महासचिव मनोज आखरे , वधूवर सूचक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी.टी. देवरे , जगन सरकटे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
Subscribe to:
Posts (Atom)