Saturday 11 May 2013

महात्मा जोतीबा फुलेच्या गौरवाची सव्वाशे वर्षे !!

स्त्रीशिक्षण, बहुजनांचे सामाजिक हक्क, वंचितांना मानवाधिकार अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय भेदाभेद अशा क्षेत्रात महान कार्य करणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना 'महात्मा' ही उपाधी ११ मे १८८८ रोजी देण्यात आली होती. त्या घटनेला आज १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातीलजुन्नर तालुक्यातील बेलसरचे सुपुत्र रावबहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी जोतिरावांना 'महात्मा' उपाधी दिली होती. जोतिबा फुले यांच्यावयाची ६0 वर्षे व समाजकार्याची४0 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे सहकारी रावबहादूर विठ्ठलराव वंडेकर, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी जोतिरावांच्या कार्याचा गौरवपूर्ण सत्कार करण्याचे ठरविले. रा.ब. वंडेकर यांनी १८८८च्या मेमध्ये मुंबईतील मांडवी कोळीवाड्यातील 'मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती-धर्मसंस्था' या संस्थेच्या सभागृहात सत्कार समारंभ आयोजित केला. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनाही वंडेकरांनी निमंत्रण दिले होते. जोतिरावांना हिदुस्थानचे 'बुकर टी. वॉशिंग्टन,' अशी पदवी द्यावी, असा निरोप सयाजीरावांनी वंडेकरयांना पाठवला होता. 'आपल्या उग्र तपस्येने महाराष्ट्रातील स्त्री-पुरुषांना मानवाधिकार मिळवून देणारे, त्यांच्यात चेतना व जागृती निर्माण करणारे जोतिराव फुले खरे 'महात्मा' आहेत. त्यांना 'महात्मा' ही उपाधी देणेच योग्य आहे,' असे वंडेकरांनी सांगितले; तसेच जनतेच्या वतीने जोतिरावांना 'महात्मा' ही उपाधी प्रदान करत असल्याचे जाहीर केले. हे जगजाहीर झाले आहे की गांधींना महात्मा ही पदवी कुणीही दिलेली नाही, अथवा त्याची नोंद कुठेही नाही. तसेच लोकमान्य, स्वातंत्र्यवीर, हिंदू हृदय सम्राट इ. उपाधी अथवा पदव्या या जनतेने दिलेल्या नाहीत तर त्या त्या व्यक्तींनी स्वत:हून लावून घेतल्या आहेत. याला मात्र अपवादआहे जोतिराव फुलेंचा. जोतिराव फुलेंना "महात्मा" ही उपाधी उस्फूर्तपणे जनतेने दिली होती व त्यासाठी भव्य महोत्सव घडवून आणला होता. महात्मा ही उपाधी मोठे कार्य करणार्‍या माणसाला लावतात. पण महात्मा या शब्दात आत्मा हा शब्द असल्याने आणि आत्मा ही संकल्पनाच बौध्द लोक मानत नसल्याने आपण आत्मा हा शब्द बोलण्यातून अथवा लिहिण्यातून टाळावा. त्याऐवजी आपण बौध्दांनी महामानव, महानायक असे शब्द वापरावेत. जोतिबा फुलेंच्या बाबतीत तर क्रांतीबा, राष्ट्रपीता हे शब्द वापरावेत. ''जनसेवा हीच ईश्‍वरसेवा आहे. हजारो वर्षे ज्यांना अस्पृश्य मानले गेले. ज्यांना मानवाधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले त्यांच्यासाठी काम करणे माझे कर्तव्य आहे,'' असे प्रतिपादन जोतिरावांनी त्या समारंभात केले होते. समाजसुधारक विठ्ठलराव वंडेकर शिक्षण व व्यवसायानिमित्त रावबहादूर वंडेकर यांचे कुटुंबीय मुंबईत स्थायिक झाले होते. वंडेकर जोतिरावांच्या सत्यशोधक चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते होते. बहुजनांच्या शिक्षण, कामगार, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कार्य केले. ■ पुण्यात १८९५मध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वंडेकरांनी शेतकर्‍याचा गवताचा २४ फुटी पुतळा उभारून आंदोलन केले होते. मुंबई महापालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी २३ वर्षे काम पाहिले होते. ■ तसेच मुंबईत १८९३मध्ये झालेल्या जातीय दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यातही मोलाची भूमिका बजावत राणीच्या बागेत ६0 हजार नागरिकांचा शांतता मेळावा घेतला होता. साभार- Prabodhan Team

Wednesday 6 February 2013

महाराष्ट्राचा छावा हरपला

मराठा आरक्षणासाठी गेली १० वर्षे लढा देणारे नेते आणि अखिल छावा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांचे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांना कावीळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. अण्णासाहेबांचे वय अवघे ३५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे जनमानस सुन्न झाले आहे. त्यांच्यावर आधी सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तेथे प्रकृतीत उतार पडत नसल्याचे पाहून ३ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथेही त्यांची प्रकृती सुधारली नाही. गेल्या काही दिवसांपासून सततचे दौरे आणि बिघडलेल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. त्यांचीप्रकृती गंभीर असल्याचे समजल्यानंतर छावाच्या शेकडो कार्यकत्र्यांनी सोलातुरात गर्दी केली होती. पुण्यातही कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. अण्णासाहेबांनी हाती घेतलेले मराठा समाजात चेतना निर्माण करण्याचे कार्य खंडणार नाही, अशी आशा व्यक्त करतो.

Sunday 20 January 2013

संत तुकाराम महाराज अभंग

काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥ 1 ॥
अंतरींची बुध्दि खोटी । भरलें पोटीं वाईट ॥ 2 ॥
 काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥ 3 ॥
तुका म्हणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥ 4 ॥

 अर्थ : - संत तुकाराम महाराज प्रतिकाच्या रुपाने म्हणतात, जसा सर्प इतर प्राण्यांचे पिल्ल, अंडी अन्न म्हणून खातो, त्याच्याच नावावरुन " आयत्या बिळात नागोबा " अशी म्हण रुढ झाली. हा साप म्हणजे " ब्राह्मण" ! बगळा जसा डोळे मिटतो म्हणजे तो काही साधू होत नाही. त्याचे डोळे मिटविणे म्हणजे ढोंगच आहे. हा बगळा म्हणजे " ब्राह्मणा " ! उंदीर रुपी ब्राह्मण देवाला प्रदक्षिणा घालतो, गाढवरुपी ब्राह्मण अंगाला राख लावून बहुजनांना फसवितो. संत तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यामध्ये जशी सुसर असते. कावळादेखील त्यापासून सतर्कच असतो. सुसररुपी म्हणजे ब्राह्मणच ! भावार्थ : - संत तुकाराम महाराज या एका अभंगात ब्राह्मणांना साप, बगळा, उंदीर, गाढव, सुसर अशी प्रतिके लावली आहेत. ब्राह्मणांचे चरित्र किती ढोंगी,कपटी, लबाडखोर, षडयंत्रकारी असते हेच त्यांनायातून सुचवायचे आहे. ब्राह्मणांच्या चारित्र्यावरुन ' आयत्या बिळात नागोबा ' अशी म्हण रुढ झाली. ब्राह्मण अध्यात्माच्या नावावरुन मूलनिवासी बहुजनांना स्वर्ग, नरकाची भिती दाखवितो. स्वत: मलीदा खातो. स्वत: पाप करतो. ब्राह्मणाची बुध्दी ही षडयंत्रकारी असते. त्याचे पोट भरले की तो सगळयांना लाथा मारत सुटतो. उंदीर जसा मंदिरामध्ये धावत पळत सुटतो, त्याला कुणी प्रदक्षिणा म्हणेल काय ? त्याला नैवद्याचे पडते. तसे ब्राह्मणरुपी उंदीराला मूलनिवासी बहुजनांचे धन लुटण्याचे पडते. गाढवरुपी ब्राह्मणाने अंगाला राख फासली म्हणजे तो संतहोत नाही. अरे माझ्या भावा आणि बहिणींनो, या असल्या भोंदू लोकांपासून सावध रहा ! असेच संत तुकाराम महाराजांना सांगावयाचे आहे. सुसर जशी पाण्यात कुणालाही गिळंकृत करु शकते. असाच हा ब्राह्मण धर्म आहे. या ब्राह्मण धर्माला लाथाडले पाहिजे. कावळेरुपी प्रवृत्ती देखील या पासून सावध असतात. तेव्हा मूलनिवासी बहुजन समाजांनी ब्राह्मणांच्या जंजाळात फसू नये. - संत तुकाराम महाराज.