Wednesday 6 February 2013

महाराष्ट्राचा छावा हरपला

मराठा आरक्षणासाठी गेली १० वर्षे लढा देणारे नेते आणि अखिल छावा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांचे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांना कावीळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. अण्णासाहेबांचे वय अवघे ३५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे जनमानस सुन्न झाले आहे. त्यांच्यावर आधी सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तेथे प्रकृतीत उतार पडत नसल्याचे पाहून ३ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथेही त्यांची प्रकृती सुधारली नाही. गेल्या काही दिवसांपासून सततचे दौरे आणि बिघडलेल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. त्यांचीप्रकृती गंभीर असल्याचे समजल्यानंतर छावाच्या शेकडो कार्यकत्र्यांनी सोलातुरात गर्दी केली होती. पुण्यातही कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. अण्णासाहेबांनी हाती घेतलेले मराठा समाजात चेतना निर्माण करण्याचे कार्य खंडणार नाही, अशी आशा व्यक्त करतो.