Friday 24 August 2012

V.B.V.P.विद्यार्थांना दिशा देणारी संघटना


भारत  - जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश.
- जगात लोकसंख्येत दोन नंबरचा देश.
- अनेक परकीय आक्रमणे पाहिलेले, आक्रमणे पचवलेला देश.
- एकेकाळी स्वयंपूर्ण खेडी असलेला देश.
- एकेकाळी टाचणी न तयार होणारा व आज उपग्रह तयार करणारा देश .
- सर्व जगाला मजूर, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ पुरविणारा देश.
- क्रिकेटमध्ये 'वर्ल्डकप' जिंकणारा देश.
- इ.स.२०२० ला जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारा देश.
दुसरी बाजू - शेतकर्यांच्या आत्महत्या होणारा देश.
- धार्मिक, जातीय दंगली करणारा देश.
- कर्मकांडात अडकलेला देश.
- तरुणांच्या हाताला काम व बुद्धीला दिशा न मिळालेला देश.
- ऑलीम्पिक २०१२ लंडन मध्ये एकही सुवर्ण पदक न मिळालेला देश.
- स्त्री अर्भकांचा गर्भपात करणारांचा देश.
         भारत इ.स. २०२० ला महासत्ता होणार अशी चर्चा सध्या भारतामध्ये विद्वान व प्रचार प्रसार माध्यमे करत आहेत. इ.स. २०२० यायला अजून आठ वर्षे बाकी आहेत. या आठ वर्षात भारत महासत्ता होणार म्हणजे नेमके काय होणार? हे ज्यांच्या सामर्थ्यावर भारत देश महासत्ता बनवायचा त्या तरुणांनाच नेमके कळलेले नाही. भारत महासत्ता बनणार म्हणजे नेमके काय? आम्ही सैनिकी हल्ले करून सर्व जग ताब्यात घेणार ? आमच्या भारतीय कंपन्या इतर देशात जाऊन सर्व व्यापार ताब्यात घेणार? नेमके काय करणार? हेच भारतीय तरुणांना नेमके माहित नाही. बर्याच तरुणांना तर तालुका, जिल्हा, राज्य, देश, खंड यातील फरकही निट कळत नाही. मग भारत महासत्ता होणार कसा? बरे क्रिकेट सारखी महासत्ता होण्याची काही स्पर्धा आहे का? म्हणजे अंतिम सामना फिक्सिंग करून जिंकावा व भारताला महासत्ता बनवावे अशी काही तरतूदही नाही. या देशातील तरुणांना महासत्ता होणे म्हणजे काय? हेच अजून माहित नाही आणि आम्ही भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहत आहोत.
         स्वप्न पाहणे गुन्हा नाही. स्वप्न पाहण्याला ट्याक्सहि नाही. मोठी स्वप्ने अवश्य पहावितच परंतु या स्वप्नपूर्ती साठी नियोजन नावाचा काही भाग असतो. त्या नियोजनाची अंमलबजावणी व्हावी लागते. या अंमलबजावनीला प्रतिसाद मिळावा लागतो त्यासाठी अहोरात्र कष्ट करून झोकून देणारी माणस निर्माण करावी लागतात नव्हे अशी मानस निर्माण व्हावी लागतात तरच या स्वप्नांची पूर्तता होत असते. मला सांगा भारत महासत्ता बनविण्याचे कोणते प्रयत्न या देशात होत आहेत? ज्या देशात मुलगी नको वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा हट्ट धरला जातो . बरे मुलगा झाल्यावर त्याला दिशा देण्याचा त्याच्यावर काही संस्कार करण्याचा प्रयत्न पालक करत आहेत काय? माझे तर असे मत आहे कि घरात जसे कुकर, फ्यान, मिक्सर, ग्यास, फ्रीज असावे तसा मुलगाही असावा अशी आमच्या समाजाची मनोवृत्ती आहे. मुलगा होत नसेल तर बाराभानगडी करून पाण्यासारखा खर्च करतील, पैसे नसतील तर कर्जबाजारी होतील पण मुलगा होण्यासाठी गंड्या दोर्यापासून टेक्सट्यूब बेबीपर्यंत प्रयत्न करतील. मुलगा झाल्यावर प्रचंड खर्च करून वाढदिवस  साजरा करतील परंतु त्या मुलावर शिक्षणासाठी, विविध कला शिकण्यासाठी पुन्हा खर्च करणार नाहीत. भारताला आत्ता ऑलीम्पिक मध्ये एकही सुवर्ण पदक मिळाले नाही म्हणून बोंबलनारे आपला मुलगा, मुलगी ग्राउंडवर जाणार नाही याची काळजी घेतात. बरे या मुलांसाठी मोकळी जागा राहिली कोठे? की जेथे मुलांनी जाऊन खेळावे, खेड्यात पूर्वी गायरान असायचे ते गेले. शहरात अतिक्रमणे वाढली सोसायटीच्या मोकळ्या जाग्यावर चढाओढीने मंदिरे बांधली, मुले खेळणार कोठे? एखाद्याला फारच इच्छा झाली तर त्याला क्रीडा साहित्य उपलब्ध होत नाही, झाले तर महाग. शाळेत खेळाचातास नाही, असेल तर क्रीडा शिक्षक  नाही, तो असेल तर त्यालाच खेळाची आवड नाही. खेळाडू घडणार कसे? गजगे, गोट्या, लंगडी,हुतुतू,सूरपारंभ्या, लगोरचे आमचे हे खेळ आंतरराष्ट्रीय नाहीत व आंतरराष्ट्रीय खेळ आम्हाला येत नाहीत. सुवर्ण पदक मिळणार कसे?
              अजूनही आमच्या देशातील तरुणांना देशावर प्रेम करणे याचा अर्थ फक्त सैन्यात जाऊन हातात बंदूक घेऊन सीमेवर उभे राहणे म्हणजे देशप्रेम समजतात. या देशाला खेळात सुवर्ण पदक मिळवून देणे, शेतीतील उत्पन्न वाढविणे, उद्योगधंद्याची प्रगती करणे, नवीन नवीन तंत्रज्ञान निर्माण करणे, धरणे बांधणे, कालवे काढणे, सैन्यात भरती होणे, मोठमोठ्या इमारती उभारणे, रस्ते बांधणे, रेल्वे जाले निर्माण करणे, प्रत्येक जिल्हा हवाई मार्गाने जोडणे, विध्यार्त्याना शिकविणे, विज्ञाननिष्ठ अभ्यासक्रम निर्माण करणे, इच्छाशक्ती व नजर असलेली मानस निवडून देणे, निवडून आल्यावर देशासाठी आहोरात्र काम करणे, वक्ता, लेखक, नाटककार, शाहीर, चित्रकार, पत्रकार, कीर्तनकार होऊन मनोरंजनातून जनजागृती करणे, डॉक्टर होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे थोडक्यात आपण आहोत त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणे म्हणजेच देशसेवा असते. अगदी तुम्ही परदेशात जाऊन परकीय चलन देशात पाठविणे ही सुद्धा देशसेवाच आहे. त्यामुळे फक्त सैन्यात जाने म्हणजेच देशसेवा हे अगोदर तरुणांच्या डोक्यातून जाने अत्यावश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की सैन्यात गेल्यावर देशसेवा होत नाही. सैन्यात गेल्यावर तर देशसेवा होतेच तसेच या देशात राहून रस्ता झाडण्यापासून मोठमोठ्या बिल्डींग बांधण्यापासून स्वयंपाकी होण्यापर्यंत कोणतेही कार्य झोकून देऊन करणे म्हणजेच देशसेवा असते. हा विचार तरुणापर्यंत गेला की भारत महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.
                भारतात अजूनही तरुणशक्ती दुर्लक्षित आहे. लहानपणापासून श्रमप्रतिष्ठा मूल्य समजाविणे अत्यावश्यक आहे मुलावर संस्कार होणे, त्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यावश्यक आहे दुर्देवाने असे होत नाही. या देशातील बालकांसाठी बालसाहित्य उपलब्ध नाही. त्यांना कोणीही स्वप्न दाखवीत नाही, प्रेरणा देत नाही, लहानपणी आई म्हणते 'जन्मल्या जन्मल्या नख लावलं असते तर बरे झाले असते'. वडील म्हणतात 'वाया गेलेलं पोरग आहे'. शाळेत जावे तर शिक्षक म्हणतात 'काहीच येत नाही नालायक बस खाली'. यातून काय प्रेरणा घेणार बोला?
                या सर्वांचा अभ्यास करून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुशोत्तमजी खेडेकर यांनी वीर भगतसिंह विध्यार्थी परिषद या मराठा सेवा संघाच्या स्वतंत्र कक्षाची निर्मिती करून या देशातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न दाखविणे, त्यांना प्रेरणा देणे, त्याच्यातील सुप्तगुणांना हेरून त्यांची सर्वांगीण प्रगती करणे या हेतूने VBVP ची स्थापना केलेली आहे.
                आज महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात VBVP कार्यरत असून २८ नोव्हे २०१२ ला माजलगाव जि.बीड येथे VBVP चे राज्य अधिवेशन असून नोव्हे २०१३ ला औरंगाबाद येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे नियोजन सुरु आहे. महाराष्ट्रातील विध्यार्थी VBVP कडे प्रेरणा देणारी, दिशा देणारी संघटना म्हणून पाहत आहे कारण VBVP मध्ये विध्यार्त्याचा वापरा आणि फेकून द्या असा ' कडीपत्ता' होणार नाही. वकृत्व, नेतृत्व,कर्तृत्व याचे प्रशिक्षण देणारी ही संघटना असून मोठे झाल्यावर समाजाकडे 'वळून पाहणारे' नागरिक यातून निर्माण होणार आहेत.  VBVP म्हणजे जगाला गवसणी घालणारे नागरिक निर्माण करून भारत महासत्ता बनविणारे संघटन आहे.
परवा एक sms आला तो पुढील प्रमाणे 
' इस देश का क्या होगा क्योंकी 
 बुढे लोग देश चला रहे है और
 जवां लोग फेसबुक खेळ रहे है ! '
या फेसबुक खेळणाऱ्या तरुणांना देश चालविण्यास सक्षम करणे व त्यातून व्यवस्था परिवर्तन करणे हेच VBVP चे अंतिम उद्दिष्ट आहे.






                    -प्रदीप सोळुंके
                     प्रदेशाध्यक्ष
                     वीर भगतसिंह विध्यार्ती परिषद,
                     मोब. ९४२२२९५१५२

Saturday 18 August 2012

शिवधर्मसंस्कार विधी

हे सर्वच आनंद व्यक्त करण्यासाठी आहेत. हा आनंद आपापल्या सामाजिक -आर्थिक कुवतीनुसार व्यक्त व्हावा, कर्ज काढून वा उधल पट्टी करूनव्यक्त करू नये. सामुहिकतेवर भर असावा,याचा अर्थ त्याचे स्वरुप दरिद्री असावे असा घेऊ नये. 1 ) नहान संस्कार:- मुलगी वयात आल्यावर करावयाचा विधी . २) गर्भाधान संस्कार:- कुटूम्बतिल स्त्री गर्भवती झाल्याचे निश्चित झाल्यावर त्याविषयीचा आनंदसोहला साजरा करावा. गर्भवतीस सर्व प्रकारचा धीर द्यावा, तपासन्या कराव्यात. गर्भाधान सोहला गीत माऊली गे उद्याची,वांछितो ं सारयांसवे, स्वास्थ्य लाभावे निरामय तुज गडे बालासवे ध्रु कूस उगवे गे तुझी अन्,सुखविले सारयांस तू, स्पंदनांना लय दिली अन्, मोकले आकाश तू; नाद तुझिया अंतरीचा, वाहवी श्वासांसवे...स् वास्थ्य लाभावे..... माऊलीचे धन्य जीवन, अनुभाविशी तू या क्षणी, गौरवाया तुज गडे हे, शब्द अपुरे औक्षणी; दाटला आनंद आणिक ,चिंब नयनी आसवे...स्वास्थ् यलाभावे..... ३) जन्म संस्कार:- कुटूम्बात स्त्री च्या प्रसूति नंतर आई व अपत्याच्या सुदृढ़तेसाठी आनंद साजरा करून नवागताचे स्वागत करावे. नवजात बालक कर्तृत्ववा न व्हावे या भावनेने सामुहिक आनंद व्यक्त करावा. ४) नामकरण संस्कार:- जिजाऊ पूजन करून अपत्याचे नामकरण करावे व त्यानिमित्त यथाशक्ति जिव्हाल्याच्या व्यक्तींसह स्नेह मिलन सोहला साजरा करावा.अपत्याचे नाव प्रेरणादायक राहिल असे आपल्या आवडीने ठेवावे.पूर्ण नाव लिहिताना बालकाचे नाव, आईचे नाव, वड़ीलांचे नाव, आड़नाव, असे लिहावे ,शिवधर्म नावे वापरावित. ५) बाल संस्कार:- बाल संस्कार हे भावी आयुष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक असतात,बालकास जाणीवपूर्वक घड़विन्यासाठी या संस्काराची गरज आहे. ६) शिक्षण संस्कार:- मूल पहिल्यांदा शाळेत जाण्याच्या दिवशी तसेच घरातून बाहेर पड़न्या पूर्वी जिजाऊ पूजनव प्रार्थना म्हणून शाळेत पाठवावे. मूल आनंदाने शाळेत जावे. ७) समाजऋण संस्कार:- समाजामध्ये स्वतःचे सामाजिक जीवन आणि समाजाचे सामाजिक जीवन,राष्ट्र जीवन सशक्त होंन्यासाठी समता,स्वातंत्र् य,बंधुत्वाचा व्यवहार व न्याय बुद्धि ह्यांची जाणीव करवूनदेणारा सोहला आपणास आदरणीय वाटनारया कोणत्याही स्त्री-पुरुषाच् या जयंतिला कुटूम्बात करावा किंवा पुर्वजाचे स्मरण म्हणून आपल्या कुटूम्बातील व्यक्तिच्या जयंतिदिनी हा सोहला करावा व समाजप्रती कृतज्ञता व्यक्त करने. ८) सामुहिक नागरी संस्कार:- प्रत्येक शिवधर्मीय व्यक्ति ही देशाची सुबुद्ध व सशक्त नागरि क असावा यासाठी हा संस्कार आहे. राज्यघटना परिचय - नागरी परिचयकरावा. ९) आपकमाई संस्कार:- कुटुम्बातील व्यक्ति प्रथम उद्योगव्यवसाय,न ोकरी अशा पद्धतिच्या आपकमाईस जाइल त्यावेळी त्यास प्रोत्साहन मिळेल असा आनंद व्यक्त करावा . १०) विवाह संस्कार :- कुटुम्बातिल मुलीचा विवाह १८ वर्षे वय झाल्यावर करावा व मुलाचा विवाह २१ वर्षे वय झाल्यावर करावा ( याविषयी कायद्याचे पालन करावे ) विवाह संस्कारात नाते संबंध पाहने,मुला-मुली ची विविध क्षेत्रीय माहिती पाहने,मुलगा-मुल गी पाहने, पसंति, कुंकू ,साखर पुडा इतर सामाजिक सोपस्कार,प्रत्य क्ष विवाह संस्कार अशा बाबिंचा समावेश आहे ११) सामाजिक संबंध :- सामजिक व कौटूम्बीक संबंध मानवी व सहज असावेत, आपली वाटचाल, गणगोत व इतरांचा आदर करून सहजीवन जगण्याची प्रेरणा यातून मिळावी. १२) गृहप्रवेश संस्कार :- जिजाऊपूजन करून व अधिकृत प्रार्थना करून गृहप्रवेश करावा,प्रबोधन कार्यक्रम करावा, आनंद उत्सव करावा, कामगार, मजूर, कारागिराना सन्मानित करावे. १३) आनंद उत्सव संस्कार :- जीवनातील कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी आनंदउत्सव साजरा करावा.याचे स्वरुप सोयीनुसार असावे, उदा. वाढदिवस, परीक्षा पास होणे, प्रमोशन होणे, व्यवसायात फायदा होणे, व्यवहारात बदल होणे, लग्नाचा वाढदिवस, परदेशप्रवास ईत्यादी १४) मृत्यु संस्कार :- शिवधर्मीय व्यक्तीला मृत्यु आल्यास खालीलपैकी एक पर्याय निवडता येईल: १) देहदान २) दाहसंस्कार ३) मृत्तिका संस्कार ( पुरने ) १५) मृत्योत्तर संस्कार :- सविस्तर विधि कार्यक्रमासाठी "शिवधर्मं भाग २ व ३" या जिजाई प्रकाशन , पुणे च्या पुस्तकांचा वापर करावा हे संस्कार विधि जिजाऊसृष्टि सिंदखेडराजा,जिजाई प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झाले आहेत . "शिवधर्म ठरावा विश्वधर्म".....

Monday 13 August 2012

वाघ्या कुत्रा हटवाच !!!!!

वाघ्याचा गोंडा आणि वाघ्या समर्थक... रायगडावरून वाघ्या हटविल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी असे चित्र उभे केले कि वाघ्या हटविन्याला रायगड स्थानिक लोकांचा विरोध आहे आणि ते संभाजी ब्रिगेडच्या विरोधात गेलेआहेत आणि tv वर पण अश्याच लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या ज्यांना वाघ्या नावाचंकुत्र देखील ओळखत नाही आणि जे संभाजी ब्रिगेड चा द्वेष करण्यात शेपटीला भाशिंग बांधून तयार असतात पण सत्य काहीतरी वेगळेच आहे रायगड मधील मराठा समाज तर ब्रिगेडच्या पाठीशी होताच पण इतर समाज देखील वाघ्याला हटाव ह्याच भूमिकेचा होता पण प्रसिद्धी माध्यमांनी हि बातमी मुद्दामून दडवली आणि महाराष्ट्त्रातल ्या लोकांसमोर वेगळेच चित्र निर्माण केले.पुढे काही बहुजन समाजातल्या विविध जातीच्या नेत्यांच्या वाघ्याविशयीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यावरून सत्य काही तरी वेगळेच आहे हे कळत.रायगड कोकणस्थ तेली समाजसेवा संस्था सल्लागार आणि विचारवंत श्याम घोडके,चर्मकार संघटना रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीपभाई भोयर,रायगड जिल्हा बुरुड समाज अध्यक्ष संदेश्भाई नागे,बाबासाहेबा ंचे नातू आनंदराजआंबेडकर,नव्बौद् धांचे नेते जोगेंद्र कवाडे,आदरणीय वामन मेश्राम साहेब ह्या सर्व जातीय नेत्यांनी संभाजी ब्रीगेद्चीच बाजू घेतली आणि वाघ्या हा शिवरायांच्या अपमानाचा क्षण आहे आणि तो उद्ध्वस्तच केला पाहिजे हेच सांगितले तसेच प्रसिद्धी माध्यमांनी दुसरी एक वावडी उठवली कि धनगरांचा वाघ्या काढण्याला विरोध आहे पण गोपाल कोल्हे वरिष्ठनेते धनगर समाज अकोला ह्यांनी रायगडावरील वाघ्या शिवरायांचीच नव्हे तर मल्हारराव होळकरांची बदनामी करणारा आहे म्हणून तो त्वरित हटवावा ह्या मागणीसाठी कल्लेक्टार कार्यालयासमोर दिवसभर धरणे धरा आंदोलन करून सामाजिक ऐक्याचे प्रदर्शन घडवले पण प्रसिद्धी माध्यमांनी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी लपविल्या या सर्व लोकांच्या प्रतीक्रीयावरून एव्हढेच स्पष्ट होते कि वाघ्याला समर्थन देणार्यांच्या सोबत कुठलाचसमाज नाही तर फक्त वाघ्याचा गोंडा आहे आता तोगोंडा फक्त घोळायचा कि चोळायचा हा त्या समर्थकांचा प्रश्न आहे........
जय जिजाऊ ...... जय शिवराय..... जय मल्हार..... - शिवश्री प्रदीप इंगोले

Tuesday 7 August 2012

वाघ्या का हटवला

वाघ्या कुत्र्याचे शिल्प संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी का काढले ?? किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्पसंभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी का काढले ?? १.शिवरायांच्या समाधी शेजारी बसवण्यात आलेला वाघ्या कुत्रा हा पूर्णपणे काल्पनिक होता.त्याचा कोणताच उल्लेख समकालीन किंवा उत्तरकालीन साधनात नाही.असे शिल्प बसवण्यामागे व होळकरांची कथा प्रसिद्ध करण्यामागे शिवप्रेमी होळकर आणि शिवाजी महाराज यांची बदनामी एवढाच कट होता. २. शिवकालीन समकालीन साधने, बखरी,मोघल,इंग्रज,प्र­ोतुगीज, इत्यादी दस्तावेजामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही.. ३. हि दंतकथा ,पहिल्यांदा ची.ग.गोगटे यांच्या १९०५ साली प्रसिद्ध केलेल्या "महाराष्ट्र देशातील किल्ले"या पुस्तकात आहे. ४."राजधानी रायगड" (१९२९) या महत्वाच्या अभ्यासपूर्ण पुस्तकात वाघ्याच्या कुत्र्याचा उल्लेख नाही. ५.शिवसमाधीचा जीर्णोद्धार १९२६ते १९२७ या कालावधी मध्ये पूर्ण झाल्यानंतर ..त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे १९३६ साली वाघ्या कुत्र्याचा पुतळा महाराणी पुतळाबाई यांच्यासमाधीवर बसविण्यात आला .. ६. शिवसमाधीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हि रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष न.चि. केळकर(शाहू महाराज यांना स्वराज्यद्रोही म्हणणारे आणि ब्राम्हण ब्राम्हणेतर वादामध्ये ब्राम्हणाचे नेतृत्व करत होते.ज्या वेळेस शाहू महाराज बहुजन समाजाचे नेतृत्व करत होते ) व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मारकासाठी पैसे जमा करण्याचे काम सुरूच ठेवले होते .याच वेळी महाराष्ट्रात ब्राम्हण-ब्राह्मणेतर­ वाद हि जोरात सुरु होता. शिवरायांच्या विषयी च्या पवित्र कार्यामाध्येही हा वाद डोकावला आणि शिवरायांच्या समाधी शेजारी महाराणी पुतळाबाई यांची समाधी असण्याऱ्या चौथऱ्यावरएका काल्पनिक कुत्राची समाधी उभी राहिली.. ७."वाघ्या"असे नामकरण राम गणेश गडकरी यांच्या "राजसंन्यास"या नाटकातून झाले.याच नाटकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेना बदनाम केले. त्याच नाटकातील मजकूर त्या पुतळ्याखाली लिहिला,हा तर मोठ्या बदनामीचा कळस झाला .. ८. रायगड स्मारक समितीतील मंडळी शिवस्मारकासाठी निधी जमवायला इंदूर येथे होळकर संस्थानिकांकडे गेली होती. शिवरायांच्या स्मारकासाठी पैसे देणे इंग्रजांना आवडणार नाही असे तुकोजीराव होळकर यांची खात्री होती म्हणून त्यांनी समितीच्या सभासदाची गाठ घेण्यास टाळाटाळ केली.कारण सांगितले कि होळकर राणीसाहेबांचे लाडके कुत्रे वारले होते त्यामुळे त्याचे सुतक असल्यामुळे भेट होऊ शकणार नाही.स्मारक समितीची माणसे चिकाटीची आणि चाणाक्ष होती..त्यांनी आपली गरज आणि महाराजांची व्यावहारिक अडचण लक्षात घेऊन त्यांनी अफलातून तोडगा सुचवला. महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा. कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही. इंग्रज अवकृपेची भीती नाही. तोडगा उपयोगी पडला होळकरांनी देणगी दिली. आणि समितीने काल्पनिक कुत्र्याचा पुतळा रायगडवर उभारला अशी आख्यायिका आहे..हि आख्यायिका शिवप्रेमी तुकोजीराव होळकर यांची बदनामी करणारी आहे..ज्यांनी शिवचरित्र जगभर पोहचवले ,शाहू महाराज यांचे नातेवाईक होते त्यांनी आणि शाहू महाराज यांनी ठरवून २५ धनगर मराठा विवाह घडवून आणले .. ९. शिवरायांच्या समाधी शेजारी शिवरायांच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या महाराणी पुतळाबाई यांची समाधी होती त्यावर काल्पनिक नाटकातील कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला आहे त्यामुळे महाराणी पुतळाबाई यांचा अवमान होत आहे तसेच शिवरायांचाही अवमान होत आहे..त्यामुळे समस्त शिवप्रेमीचां राग अनावर होतआहे .. १०. स्वराज्य स्थापन करीत असताना शिवरायांच्या सोबत स्वराज्यासाठी लढलेल्या असंख्य सेनापती,शूरवीर मावळे,स्वराज्याची संकल्पना शिवरायांच्या मनात बिंबवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊआऊसाहेब या पैकी कुणाचीही समाधी तत्कालीन राजधानी रायगडावर नाही .परंतु काल्पनिक नाटकावर आधारित वाघ्याकुत्र्याची समाधी कशी काय ?? मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते हे शिवप्रेमी आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी पुतळाबाई यांचा होत असलेला अवमान कदापी सहन करू शकत नाही ..याच भावनेतून १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजीब्रिगेड चे शिवक्रांतीवीर शिवश्री महेश चव्हाण(सोलापूर) व शिवश्री नितीन रोठे पाटील(नाशिक) यांच्या नेतृत्वाखाली असंख्य संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी अनऐतिहासिकवाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून टाकले होते. परंतु शासनाने पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी वाघ्या कुत्राचे शिल्प बसविले. त्यामुळे हे सरकार शिवप्रेमी आहे कि श्वानप्रेमी आहे ? असा प्रश्न पडतो.. वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी महाराणी पुतळाबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या होत असलेल्या अवमानाच्या विरोधात, आपल्या अस्मितेसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तमाम शिवप्रेमींना करण्यात येत आहे . समस्त बहुजन समाजाला ब्राम्हणी गुलामगिरीतून मानसिकदृष्ट्या मुक्त करण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. बहुजन समाजात जाणीवपूर्वक फुट पाडणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे