Tuesday 7 August 2012

वाघ्या का हटवला

वाघ्या कुत्र्याचे शिल्प संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी का काढले ?? किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्पसंभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी का काढले ?? १.शिवरायांच्या समाधी शेजारी बसवण्यात आलेला वाघ्या कुत्रा हा पूर्णपणे काल्पनिक होता.त्याचा कोणताच उल्लेख समकालीन किंवा उत्तरकालीन साधनात नाही.असे शिल्प बसवण्यामागे व होळकरांची कथा प्रसिद्ध करण्यामागे शिवप्रेमी होळकर आणि शिवाजी महाराज यांची बदनामी एवढाच कट होता. २. शिवकालीन समकालीन साधने, बखरी,मोघल,इंग्रज,प्र­ोतुगीज, इत्यादी दस्तावेजामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही.. ३. हि दंतकथा ,पहिल्यांदा ची.ग.गोगटे यांच्या १९०५ साली प्रसिद्ध केलेल्या "महाराष्ट्र देशातील किल्ले"या पुस्तकात आहे. ४."राजधानी रायगड" (१९२९) या महत्वाच्या अभ्यासपूर्ण पुस्तकात वाघ्याच्या कुत्र्याचा उल्लेख नाही. ५.शिवसमाधीचा जीर्णोद्धार १९२६ते १९२७ या कालावधी मध्ये पूर्ण झाल्यानंतर ..त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे १९३६ साली वाघ्या कुत्र्याचा पुतळा महाराणी पुतळाबाई यांच्यासमाधीवर बसविण्यात आला .. ६. शिवसमाधीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हि रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष न.चि. केळकर(शाहू महाराज यांना स्वराज्यद्रोही म्हणणारे आणि ब्राम्हण ब्राम्हणेतर वादामध्ये ब्राम्हणाचे नेतृत्व करत होते.ज्या वेळेस शाहू महाराज बहुजन समाजाचे नेतृत्व करत होते ) व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मारकासाठी पैसे जमा करण्याचे काम सुरूच ठेवले होते .याच वेळी महाराष्ट्रात ब्राम्हण-ब्राह्मणेतर­ वाद हि जोरात सुरु होता. शिवरायांच्या विषयी च्या पवित्र कार्यामाध्येही हा वाद डोकावला आणि शिवरायांच्या समाधी शेजारी महाराणी पुतळाबाई यांची समाधी असण्याऱ्या चौथऱ्यावरएका काल्पनिक कुत्राची समाधी उभी राहिली.. ७."वाघ्या"असे नामकरण राम गणेश गडकरी यांच्या "राजसंन्यास"या नाटकातून झाले.याच नाटकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेना बदनाम केले. त्याच नाटकातील मजकूर त्या पुतळ्याखाली लिहिला,हा तर मोठ्या बदनामीचा कळस झाला .. ८. रायगड स्मारक समितीतील मंडळी शिवस्मारकासाठी निधी जमवायला इंदूर येथे होळकर संस्थानिकांकडे गेली होती. शिवरायांच्या स्मारकासाठी पैसे देणे इंग्रजांना आवडणार नाही असे तुकोजीराव होळकर यांची खात्री होती म्हणून त्यांनी समितीच्या सभासदाची गाठ घेण्यास टाळाटाळ केली.कारण सांगितले कि होळकर राणीसाहेबांचे लाडके कुत्रे वारले होते त्यामुळे त्याचे सुतक असल्यामुळे भेट होऊ शकणार नाही.स्मारक समितीची माणसे चिकाटीची आणि चाणाक्ष होती..त्यांनी आपली गरज आणि महाराजांची व्यावहारिक अडचण लक्षात घेऊन त्यांनी अफलातून तोडगा सुचवला. महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा. कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही. इंग्रज अवकृपेची भीती नाही. तोडगा उपयोगी पडला होळकरांनी देणगी दिली. आणि समितीने काल्पनिक कुत्र्याचा पुतळा रायगडवर उभारला अशी आख्यायिका आहे..हि आख्यायिका शिवप्रेमी तुकोजीराव होळकर यांची बदनामी करणारी आहे..ज्यांनी शिवचरित्र जगभर पोहचवले ,शाहू महाराज यांचे नातेवाईक होते त्यांनी आणि शाहू महाराज यांनी ठरवून २५ धनगर मराठा विवाह घडवून आणले .. ९. शिवरायांच्या समाधी शेजारी शिवरायांच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या महाराणी पुतळाबाई यांची समाधी होती त्यावर काल्पनिक नाटकातील कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला आहे त्यामुळे महाराणी पुतळाबाई यांचा अवमान होत आहे तसेच शिवरायांचाही अवमान होत आहे..त्यामुळे समस्त शिवप्रेमीचां राग अनावर होतआहे .. १०. स्वराज्य स्थापन करीत असताना शिवरायांच्या सोबत स्वराज्यासाठी लढलेल्या असंख्य सेनापती,शूरवीर मावळे,स्वराज्याची संकल्पना शिवरायांच्या मनात बिंबवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊआऊसाहेब या पैकी कुणाचीही समाधी तत्कालीन राजधानी रायगडावर नाही .परंतु काल्पनिक नाटकावर आधारित वाघ्याकुत्र्याची समाधी कशी काय ?? मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते हे शिवप्रेमी आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी पुतळाबाई यांचा होत असलेला अवमान कदापी सहन करू शकत नाही ..याच भावनेतून १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजीब्रिगेड चे शिवक्रांतीवीर शिवश्री महेश चव्हाण(सोलापूर) व शिवश्री नितीन रोठे पाटील(नाशिक) यांच्या नेतृत्वाखाली असंख्य संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी अनऐतिहासिकवाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून टाकले होते. परंतु शासनाने पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी वाघ्या कुत्राचे शिल्प बसविले. त्यामुळे हे सरकार शिवप्रेमी आहे कि श्वानप्रेमी आहे ? असा प्रश्न पडतो.. वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी महाराणी पुतळाबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या होत असलेल्या अवमानाच्या विरोधात, आपल्या अस्मितेसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तमाम शिवप्रेमींना करण्यात येत आहे . समस्त बहुजन समाजाला ब्राम्हणी गुलामगिरीतून मानसिकदृष्ट्या मुक्त करण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. बहुजन समाजात जाणीवपूर्वक फुट पाडणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.