हे जिजाऊ!
आदि माये ! महामाये !!
आम्ही सर्व तुझी लेकरें
तुला कृतज्ञतापूर्वक वंदन करतो
कळीकाळाचा अंधार झिडकारुन
समृध्द शिवमार्गावरुन जाण्याचं
अचाट धैर्य तुझ्याच मुळ मिळालं
मिळालं मुळ जगण्याचं,
जगू देण्याचं चिरंतन ज्ञान.......... ..
प्रकटला अज्ञानाचा नाश करणारा शिवधर्मी ऊर्जास्त्रोत तुझ्याच मुळं निर्भय होऊन पिढ्या न् पिढ्यांचे गुलामीचे पाश झुगारण्याचं बळही हे माते !
सृष्टीचे सृजनाचं रूप तू निर्मिकाच्या दृष्टीचं स्वरूप तू जगणा-या जिवाला श्वास दे ! शिवधर्माचा ध्यास दे !!
पळू दे दु:खाची सावटे जळू दे विकारांची पुटे उगवू दे ऐक्याचे ,समतेचे बीजांकूर येऊ दे समृध्दीचे सर्वत्र महापूर श्रमाला बळ दे,कष्टाला फळ दे !
इडापीडा जाऊ दे, बळीचे राज्य येऊ दे !!
बळीचे राज्य येऊ दे
!! जय जिजाऊ !!

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.