Showing posts with label jijau maa saheb. Show all posts
Showing posts with label jijau maa saheb. Show all posts

Wednesday, 15 February 2012

जिजाऊ वंदना

..जय जिजाऊ ...
जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥