Sunday, 29 April 2012

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

                                                 '''या भारतात बंधूत्व नित्य वासु दे '''
आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती खंजीरी वादनासारख्या लोक कलेतून समाजाचे प्रभोधन करनारे महाराजानी सर्व धर्माच्या लोकांनी मानवता धर्माचे पालन करून विश्वबंधूत्वाची जपवनूक करायला हवी असा दिव्य संदेश दिला त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांचा देह समाज कल्यानासाठी चंदनाप्रमाने झिजवला १९६८ साली ते कर्क रोगाने ग्रासले असतांना मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जवळ त्यांनी त्यांच्या भावना बोलुन दाखवल्या '' मला शेकडो विँचूने चावल्याच्या वेदना होतात त्या मी सहन करू शकतो माझ्या ग्रामिण भागातील गरीब लोकांना मोठ्या शहरात जाउन माहागडे उपचार करने शक्य नाही म्हणून मी आपणास विनंती करतो कि त्यांच्या उपचारासाठी कँन्सर हाँस्पीटल काढावे '' येवढ्या मोठ्या विचाराचा विचारवंत एवढ्या वरच थांबला नाही ग्रामगीते सारखे ग्रंथ लिहुन पूर्ण समाजाला स्वंच्छंतेचे महत्त्व त्यांनी सांगीतले राष्ट्रपतीने राष्ट्रसंत अशी सनमान देवून गौरवीले हा ग्रंथ म्हणजे श्रवण पठणाची पोथी नसून प्रत्यक्ष कृतीकार्यक्रमाचा अजेंडा आहे असे ते म्हणत स्वांनूभवाच्या भक्कम आधारावर ग्रामीण पूर्नरचनेची ही अष्टपंचांग योजना आहे जीवनाचेसार या ग्रामगीतेत आहे ग्रामीण सुधारना पूर्नरचना आधूनीक प्रगती या ग्रंथामूळे होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले जयंती पूण्यतीथि साजरी करण्यासोबतच समाजाने सक्रिय व्हावे आणि या राष्ट्रसंतानी सांगितलेला मार्ग आपणा पासून स्वतःच्या घरापासून गावापासून प्रारंभ कराने व राष्ट्रधर्म विश्वबंधूत्वा निर्माण करून आपले राष्ट्र बलवान करने हेच या राष्ट्रसंताला आजच्या दिवशी खरी वंदना असेल अश्या या थोर राष्ट्रसंताला त्याच्या जयंती निमीत्य मानाचा मुजरा

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.