Sunday 3 June 2012

मी शेतकरी

मी जगतो या देशासाठी, मी मरतो या मातीसाठी, आत्मभान विसरून राबराब राबतो, तरीही पदरी निराशाच, शेताच्या बांधावर गोफण घेवून, करतो पिकांची राखण, पण, कुंपणानेच शेत खाल्ले तर, विचारच करवत नाही, चारही बाजूने कोंडमारा सहन करून, मी जगतो नव्या उमेदीने. मी या देशातील दलित, बहुजन शेतकरी, मला कोणी नाही वाली, सेझच्या नावाखाली साम्राज्यवादाची टांगती तलवार आणि, भूमिहीन होण्याची भीती, उराशी बाळगून, मी जगतो, या देशासाठी, या मातीसाठी, माझ्यासाठी.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.