जागण्याचे युग! आले आले जागा!
विवेकाशी दगा! देऊ नका !!
पिचाल्यांनो आता! दाखवा प्रताप !
फुका पश्चाताप! सोडोनिया!!
चेतव ते बळ! अंतरीचे सारे!
विकृत धुमारे! छातावया!!
विधी निषेधाचे! संस्कार कुंपण!
पुढे या त्यागून! स्वत्वासाठी!!
झाले बहु झाले! गुलामीत जीणे!
आता म्हणा गाणे! स्वातंत्र्याचे!!न्याय समतेला! आपलेसे करा!
जातीचा पसारा! जाळा त्वरे!!
कवी ...मनोज बोबडे
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.