जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून झळकले मंदिराचे कळस जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून दिसले सुहासिनिंच्या कुंकू भाळी जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पतीव्रतांच्या किंकाळ्या विरल्या नाहीत रानोमाळी || १||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून दिसले स्वप्न स्वराज्याचे जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून फुलले कर्तुत्व शिवरायांचे जिजाऊतुम्ही होत्या म्हणून विझली सतीच्या सरणाची आग जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून मुर्दाड मनाला आली जाग || २ ||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून झाली अन्याय,अत्याचार ाची अधोगती जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून स्वराज्याला मिळाले दोन दोन छत्रपती जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पिलांना क्रांतीचे पंख फुटलेजिजाऊ तुम्ही होत्या म्हणून भटशाहीचे बुरुज तुटले || ३ ||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून शिवबा सार्वभौम छत्रपती बनलेजिजाऊ तुमच्याच हयातीत रयतप्रिय राजाला भटांनी शुद्रात गणले जिजाऊ तुम्ही सल अपमानाची काळजात ठेवून पाचाडी विसावल्यातेव्हाविव्हळल्य ामनानंदुखाश्रू ढाळत होत्या रायगडच्यासावल्या || ४ ||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणूनचलढला मावळा जगला महाराष्ट्र आणि तगला मानव धर्म जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पेटून उठला आज मराठा आणि प्रगटला घराघरातून शिवधर्म.
॥जय जिजाऊ॥ ॥जय शिवराय॥
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.