आरक्षण सुरू करणारे छ. शाहू महाराज यांना गोरगरिबांच्याविषयी फारच कळवळा वाटत असे. म्हणून माणगांवच्या परिषदेत 1920 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गोर-गरिब, दीनदलित, बहुजनांचे नेते घोषित केले व म्हणाले, `आता मला काळजी करण्याचे कारण नाही. कारण आता बहुजनांचा उद्धारक, गोरगरिबांचा उद्धारक आपल्या सर्वांच्या समोर आहे. डॉ. बाबासाहेबांच्या रूपात मला तो दिसत आहे. असे बोलून बाबासाहेबांचा जयघोष केला. गोरगरिबांचा उद्धार-विकास व्हावा, या उद्देशाने शाहू महाराजांनी आपल्या दरबारात त्यांना स्थान दिले. त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून त्यांना कामे दिली. जे गोरगरिब कर्तबगार होते. ज्यांनी ज्यांनी विशेष असे नैपुण्य, कलाकुसर दाखवित होते. शाहू महाराज अशा लोकांना बक्षीस म्हणून कुणाला जमीन, तर कुणाला फेटे बक्षीस देत असे. हे उच्चवर्णीयांना आवडत नसे. काही उच्चवर्णीयांनी छ. शाहू महाराजांना सांगण्याचा देखील प्रयत्न केला. की `महाराज तुमच्याच सारखा फेटा या सिद्धु महाराने घातला आहे. तेव्हा महाराज म्हणाले, `त्या सिद्धुला माझ्यासमोर उभा करा.' तेव्हा तो सिद्धू महार लपून बसला होता. त्याला पकडले व महाराजांच्या समोर उभा केले. महाराजांनी त्याला पाहिले. तो घाबरलेल्या मनस्थितीत होता. म्हणून त्याला महाराज म्हणाले, `अरे! तूमर्दासारखा मर्द गडी. अन् घाबरतोस कशाला? अरे! तुला फेटा कसा दिसतो तो पाहण्यासाठी बोलावले आहे. तुला माझ्यापेक्षाही सुंदर दिसतो फेटा.' असे म्हणत त्याला बक्षीस म्हणूनजरीचा फेटा व जमिनीचा तुकडा दिला. तो आनंदानेउड्या मारत घरी गेला. अशाप्रकारे कोल्हापूर नगरीचे बरेच लोक फेटा बांधायला लागले. अनेक कलाकार त्यांच्या दरबारी होते. पैलवानांमध्ये गोपाळ, परीट, कसबेकर, गामा, शिंदे, माने, गणपत शिंदे, कलाकारांमध्ये आबालाल रहिमान चित्रकार, बाबूराव पेंटर, गम्यक, शंकरराव सरनाईक बालगंधर्व, केशवराव भोसले, कलावंतांमध्ये केसरीबाई अंजनीबाई मापलेकर, आल्लादियाँ खाँ, गोविंद टेबे, आनंद पेंटर, दळवी आर्टिस्ट, बाबा गजबकर माधवराव बागल अशापकारे अनेक कलाकुसरीमध्ये नाविन्य मिळविलेले अनेक कलावंत त्यांच्या दरबारी आश्रयाला होते.जातीयता नष्ट व्हावी, म्हणून भारतातील पहिले हरिजन हॉटेल, त्याचे नावं `सत्य सुधारक हॉटेल' गंगाराम कांबळे त्या हॉटेलचे मालक, शाहू महाराज टांग्याने या हॉटेलात जात व भजी, चहा, कॉफी खातपित असतं. अशाप्रकार शाहू महाराजांनी जातीयता मोडीत काढली, पण उच्चवर्णियांच्या मनातील जातीयता तशीच राहिली, मिलिट्रीमध्ये किंवा अन्य सेवामध्ये विशेष असे कार्य केलेल्या जवानांना छ. शाहू महाराजांनी जमिनी दान दिल्या आहेत. गोरगरिबांच्या जनावरांच्या चाऱयासाठी, गायरान कुरणे दान केली आहेत. गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधून दिली आहेत. मुसलमान विद्यार्थ्यांसाठी मुसलमान वस्तीगृह बांधून दिले आहेत. जैन विद्यार्थ्यांच्या सुद्धा वस्तीगृह बांधून दिले आहेत. अनेक गोरगरिबांच्यासाठी आश्रम शाळा बांधून दिल्या आहेत. अनाथ आश्रम शाळा अनेक ठिकाणी उभारल्या आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी सुद्धा शाहू महाराजांनी मदत केली आहे. अनेक शिक्षण संस्था उभारल्या आहेत व त्या शिक्षण संस्थांमधून अनेक गोरगरिब विद्यार्थ्यांनी आपले जीवन सुधारले आहेत. 30 जून, 1974 रोजी महाराष्ट्रामध्ये जन्मशताब्दी महोत्सव साजरा झाला तेव्हा महाराष्ट्र शासनातर्फे शाहू महाराजांच्या विशाल कार्यांचे दर्शन घडविणाऱया राजर्षी शाहू महाराज गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. जन्मशताब्दी महोत्सवापासून अनेक व्यक्तींनी, संस्थांनी व अनेक वृत्तपत्रांनी व राजकीय पक्षांनी महाराजांच्या नावे टपालतिकीट निघावे म्हणूनप्रयत्न करून भारत सरकारच्यावतीने टपाल तिकिट काढून त्यांचा सन्मान केला. राष्ट्रपुरूषांच्या मालिकेत शाहू महाराजांना आढळत असे स्थान प्राप्त झाले.शाहू महाराजांच्या जन्म शताब्दी निमित्ताने त्यांचे एक कायम स्वरूपी स्मारक उभे करण्याचे ठरले. त्या दृष्टीने `राजर्षी शाहू मेनोरियल ट्रस्ट' या धर्मादायी संस्थेने त्यावेळचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. या संस्थेमार्फत एक विश्वस्त निधी उभारला गेला आणि या निधीतून `राजर्षी शाहू स्मारक भवन' या नावाची भव्य व सुंदर वास्तू उभी करुन त्यांच्या स्मृतीचे जतन करण्यात आले आहे. या निधड्या छातीच्या राजांची आठवण आली की कोल्हापूरचा जुना राजवाडा आठवतो व कोल्हापुरात शाहू महाराजांनी तयार केलेल्यापैलवानांसाठी खासबाग मैदान आठवते, गोरगरिब जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी राधानगरी येथे बांधलेला लक्ष्मी तलाव ज्याच्यावर विद्युत जनीत्रे बसून वीज उत्पादन केले जाते व राधानगरी वनसंवर्धन व व्याघ्रप्रकल्प आठवतो
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.